लोकसभा घुसखोरी प्रकरण: बुधवारी लोकसभेत कामकाज सुरू असतांना अचानक पसरले धुराचे लोट, जाणून घ्या नेमकं काय घडलं.

Breaking News: काल दिनांक १३ डिसेंबर म्हणजेच बुधवारी भारताच्या लोकसभेत घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असून, विरोधी पक्षनेत्यांनी आता सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी झालेल्या या लोकसभा घुसखोरी प्रकरणी अद्याप पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री श्री.अमित शाह यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळे आज घटनेच्या दुसऱ्या दिवशी संसदेच्या विरोधी पक्षनेते आणि खासदारांनी मोठा गदारोळ निर्माण केला आहे, हा गोंधळ इतका वाढला की संसदेच कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष श्री.ओम बिर्ला यांना तब्बल तीन तासांसाठी आता सभागृहाचं कामकाज ठप्प कराव लागलं.

बुधवारी नेमकं लोकसभेत काय घडलं?

भारताच्या लोकसभेत बुधवारी सभागृहाच कामकाज सुरू असतांना काही अज्ञात दोन तरुणांनी म्हैसूरच्या एका खासदाराचा पास वापरुन लोकसभेत घुसखोरी केली होती. त्या दोन तरुणांनी अचानक प्रेषक गॅलरीतून उडी मारून सभागृहाच कामकाज ज्या ठिकाणी होत असते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांनी हातातील स्मोक कँडल फोडून सभागृहात धूर निर्माण केला होता. त्या दोन तरुणांनी “तानाशाही बंद करा” अश्या घोषणा देखील दिल्याचं सांगितलय जातयं. त्यांच्या सोबत निर्मला नावाच्या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, सभागृहाच्या बाहेर ती महिला निदर्शने करीत असतांना पोलिसांनी तिला ताब्यात घेतलयं.

तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही खासदार घाबरले आणि काही खासदारांनी वेळीच त्यातल्या एका तरुणाला पकडले आणि त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर खासदारांनी त्या दोघांना सुरक्षा दलांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या अज्ञात तरुणांनी अश्या गैरप्रकारे घुसखोरी करून सभागृहात शिरून स्मोक कँडल फेकल्यामुळे काही वेळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संसदेत अश्या प्रकारची ही पहिलीच घटना नसून याधीही जुन्या संसद भवनात अश्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. २००१ साली कालच्याच दिवशी संसद भवनात हल्ला झाला होता, त्या हल्ल्यातील शहिदांना सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली होती आणि आता त्याच दिवशी लोकसभेच्या सुरक्षेमध्ये इतकी मोठी चूक पाहायला मिळाली.

लोकसभेत काय म्हणाले राजनाथ सिंह?

मला वाटते की, ‘आपण सर्वांनी मिळून या घटनेचा निषेध करायला हवा’,असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. बुधवारी घडलेल्या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले असून आज संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी सभागृहात गदारोळ करणाऱ्या विरोधकांना शांततेच आवाहन केलं आहे. राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली असून,’अश्या प्रकारे सभागृहात गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही’ असं ते म्हणाले.

काल सभागृहात जी घटना घडली त्या घटनेचा सर्वांनीच निषेध केला असून, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, लोकसभेच्या अध्यक्षांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेऊन ताबडतोब या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, भविष्यात सर्वच पक्ष्याच्या खासदारांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण ज्या कुणाला पास देत आहोत ते अश्या प्रकारचे गैरवर्तन करणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी.
Share this post

Leave a comment