जिओ वर्ल्ड चे प्रमुख मुकेश अंबानींनी नीता अंबानींना रोल्स रॉईस कलिनन ब्लैक बैज कार गिफ्ट देऊन यंदाच्या दिवाळीची धमाकेदार सुरुवात केलेली आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी कार कलेक्शन
भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतीच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी नीता अंबानींना शाहरुख खानची आवडती रोल्स रॉईस कलिनन ब्लैक बैज कार गिफ्ट दिली आहे, ज्याची किंमत 10 करोड असून अंबानी फॅमिली मध्ये आणखी एका आलीशान महागड्या कारची एंट्री झालेली आहे.
अंबानी फॅमिली कडे 160 पेक्षा जास्त महागड्या कार असून त्यात रोल्स रॉईस, लँड रोवर रेंज रोवर, वॉल्वो, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्शे, फेरारी, लेक्सस, यासोबतच आणखी लग्जरी कार आहेत. त्यात आता मुकेश अंबानींनी नीता अंबानींना महागडी रोल्स रॉईस कार भेट देऊन त्यांच्या कार कलेक्शन मध्ये आणखी भर टाकली आहे.
अंबानी फॅमिलीतील सदस्य नेहमीच मीडिया आणि माध्यमांद्वारे आपल्या समोर दिसत असतात आणि आता अलीकडेच मुंबईतील जिओ वर्ल्ड मॉलच्या उद्घाटनाला परिवारातील सदस्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांनी मोठ्या संख्येने जिओ वर्ल्ड मॉल मध्ये उपस्थित राहून अंबानी फॅमिलीचा आनंद द्विगुणित केला होता.
जिओ वर्ल्ड प्लाझा
या कार्यक्रमामध्ये अंबानी कुटुंब अत्यंत कडक सुरक्षेत दाखल झाले होते. 1 नोवेंबर 2023 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने भारतातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ चे उद्घाटन झाले होते. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित हा मॉल 7.50 लाख स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला असून या आलीशान मॉल ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे
काय म्हणाल्या नीता अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीज ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी मीडिया समोर बोलतांना म्हणाल्या की, ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ केवळ भारतातील नाही तर जगातील सर्वोत्तम मॉल बनेल अशी मला आशा आहे आणि आम्ही त्यादिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
त्यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी माध्यमांसमोर म्हणाल्या, ‘संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँड भारतात आणून भारतातील विविध ब्रँड्स ना प्रोत्साहित करणे हा आमचा उद्देश आहे’ .
हेही याचा