या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सासूबाईंच्या वाढदिवशी शेअर केला खास फोटो, तर सासूबाई स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

आज दिनांक 7 डिसेंबर रोजी आपल्या महाराष्ट्रातील अभिनेत्याने खास सासूबाईंच्या वाढदिवशी सोशल मीडिया वर एक अप्रतिम पोस्ट शेअर करून आपल्या सासूबाईंना खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख यांचा हा फोटो आहे

source

मित्रांनो, महाराष्ट्रातील बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या सर्वांना परिचितच आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मा.श्री.विलासराव देशमुख यांचे रितेश देशमुख हे सुपुत्र आहेत आणि आपल्या खास अभिनयाच्या बळावर रितेश देशमुख यांनी विविध हिंदी आणि मराठी चित्रपटात सुद्धा अप्रतिम कामगिरी केली आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा

source

रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा यांची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. बॉलीवुड सह मराठी चित्रपटांमध्ये देखील रितेश आणि जिनिलीया यांचे हजारो चाहते आहेत. त्यांची जोडी संपूर्ण जगभरात लोकप्रिय असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम सुद्धा केले आहे. दोघेही सोशल मीडिया वर सक्रिय असतात आणि त्यांना सोशल मीडिया वर चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

जिनिलीया आणि तिची आई

source

सध्या आज रितेश देशमुखने सोशल मीडिया वर केलेली पोस्ट चर्चेत आहे कारण आज रितेशने त्याच्या सासुबाईच्या वाढदिवशी सोशल मीडिया वर एक जुना फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये जिनिलीया आणि तिची आई यांचा जुना फोटो शेअर केलेला दिसतो आहे, या फोटोमध्ये अभिनेत्री जेनेलियाने वेडिंग ड्रेस परिधान केल्याचं आपल्याला दिसत आहे. हा फोटो बहुधा रितेश आणि जिनिलीया यांच्या लग्नातला असून हा फोटो २०१२ मध्ये काढलेला आहे.
या पोस्ट मध्ये रितेश देशमुखने लिहिले आहे की, “एकाच फ्रेममध्ये दोन सौंदर्यवती! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… नेहमी आमच्या पाठिशी राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार! तुम्हाला अनंत आनंददायी आयुष्य, भरपूर प्रेम, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो”.
त्यानंतर रितेशने केलेल्या पोस्टवर स्वतः सासुबाईंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्यात त्यांनी लिहिलय की,”खूप खूप धन्यवाद राजाबेटा.. तू नेहमीच मला आधार देतोस आणि त्यामुळे माझ्या मदतीची तुला आवश्यकता नाही”.
रितेश आणि जिनिलीया यांनी शेअर केलेल्या या पोस्ट वर नेटकऱ्यांनी सुद्धा भरभरून कमेन्ट केल्या आहेत आणि काहींनी तर “रितेश सारखा काळजी घेणारा जावई सर्वांना मिळो” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश आणि जिनिलीया यांची ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी:

संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमातली लाडकी जोडी म्हणजेच रितेश आणि जिनिलीया. यांची लव्हस्टोरी देखील तितकीच रोमांचक आहे. त्यांची एक झलक सुद्धा लोकांना ‘वेड’ लावते आणि रितेशचा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला ‘वेड’ या चित्रपटाने सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यातच 20 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि विशेष म्हणजे स्वतः रितेशने या मराठी चित्रपटाच दिग्दर्शन केल होत. याच चित्रपटामध्ये रितेश आणि जिनिलीया हे दोघे एकत्र दिसले होते आणि जिनिलीयाने याच चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, त्यासोबतच रितेशने देखील या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या रांगेत पहिल पाऊल टाकलं होत.

source

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामध्ये रितेश आणि जिनिलीया पहिल्यांदा आपल्या सर्वांना एकत्र दिसले होते आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकाहानीला सुरुवात झाली होती. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदाच या दोघांची ओळख झाली होती पण तेव्हा मात्र मैत्रीचा काही ठावठिकाणा नव्हता.

त्यावेळी ते हैद्राबादच्या विमानतळावर पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते आणि तेव्हा जिनिलीयाच रितेश बद्दल काही चांगल मत नव्हत कारण त्यावेळी रितेश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता आणि त्यामुळे तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचा मोठेपणा करतोय असं जिनिलीयाला वाटायचं त्यामुळे तिने रितेशला इग्नोर करायला सुरुवात केली होती पण रितेशला मात्र तीच हे वागणं अजिबातच आवडत नव्हतं. त्यावेळी रितेश 24 वर्षांचा आणि जिनिलीया फक्त 16 वर्षांची होती, त्यानंतर हळूहळू त्या दोघांना एकमेकांविषयी समजायला लागलं आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली, असं करता करता त्या मैत्रीच कधी प्रेमात रूपांतर झालं ते कळलच नाही.

दरम्यान चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल होत त्यामुळे ते एकमेकांना खूप मिस करत होते आणि त्यानंतर तब्बल 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये रितेश आणि जिनिलीया विवाहबंधनात अडकले. रितेश आणि जिनिलीयाला आता रियान आणि राहील ही दोन जुळी मुले आहेत.

रितेश देशमुखचा जीवनप्रवास :

रितेश देशमुख हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेलं एक मोठ नाव आहे, रितेशने आपल्या अलौकिक अभिनयाच्या बळावर सिनेमासृष्टीत आपली ओळख निर्माण केली असून रितेश सुरुवातीचा काळात एक विनोदी अभिनेता म्हणून उदयास आला होता.

अश्या या हरहुन्नरी कलाकाराचा जन्म महाराष्ट्रातील लातूर जिल्हयात 17 डिसेंबर 1977 रोजी झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री. विलासराव देशमुख यांचे रितेश हे द्वितीय सुपुत्र आहेत. वडील राजकारणात असल्यामुळे रितेशला लहानपणापासूनच राजकारणाचा वारसा लाभलेलेला होता. रितेशने जी डी सोमणी मेमोरियल स्कूल या शाळेमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील कमला रहेजा या कॉलेज मधून आर्किटेक्ट ही पदवी संपादन केली.

पदवी संपादन केल्यानंतर रितेशने अभिनयाची प्रथम सुरुवात तुझे मेरी कसम या रोमॅंटिक चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर रितेशने विविध हिंदी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनय करत असतांना रितेश हळू हळू स्वतः मध्ये लपलेला निर्माता जागा करण्याचा प्रयत्नात होता आणि आता रितेशने ‘वेड’ या चित्रपटातून दिग्दर्शनाला देखील सुरुवात केली आहे.
Share this post

Leave a comment