IND VS AUS 2nd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी विजय.

India vs Australia 2nd T20I Prediction: Who will Win IND vs AUS T20 ...

SOURCE

IND VS AUS T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारताने कांगारूंना नमवून पाच सामन्यांच्या मालिकेत सलग दूसरा सामना जिंकला.

यशस्वी जयसवाल:

yashvi jaiswal

तिरुअनंतपुरम येथे काल झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला 236 धावांचे आव्हान दिले. भारताचा सलामीचा युवा फलंदाज यशस्वी जयसवालने तुफानी फटकेबाजी करून 25 चेंडूत 53 धावा काढल्या आणि भारताला हवी तशी सुरुवात करून दिली, त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

ऋतुराज गायकवाड :

त्याला साथ म्हणून ऋतुराज गायकवाडने देखील 43 चेंडूत 58 धावा काढल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

ईशान किशन :

ishan kishan

यशस्वी जयसवाल तुफानी अर्धशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ईशान किशनने आक्रमक पवित्रा स्वीकारला, ईशानने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकरांच्या मदतीने 52 धावा केल्या आणि भारताला मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाची साथ दिली.

रिंकु सिंह:

rinku singh

source

त्यानंतर आयपीएल मध्ये अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलेल्या लॉर्ड रिंकु सिंह मैदनात आला आणि भारताची धावसंख्या 200च्या पार पोहोचवून पुन्हा एकदा आपली अप्रतिम खेळी सादर केली. रिंकु सिंहने फक्त 9 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकरांच्या मदतीने तब्बल 31 धावा काढल्या आणि यंदाचा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला 236 धावांचे आव्हान दिले.

संबंधित बातम्या:

भारताच्या पराभवास ही 4 कारणे जबाबदार, याच गोष्टींमुळे अजेय भारताने गमावला विश्वकप 2023.

भारतीय गोलंदाजांची अफलातून कामगिरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी -20 सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून फलांदाजिस आलेल्या स्टीव स्मिथ आणि शॉर्ट यांनी आक्रमक सुरुवात केली होती पण युवा भारतीय गोलंदाज रवी बिश्नोईने शॉर्टला 19 धावांवर रोखले आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर रवीने पुढ्याच षटकात जोश इंग्लिशला बाद केले आणि भारताला भक्कम पाठिंबा दिला.

त्यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप सामन्यात अफगानिस्तान विरुद्ध तब्बल 201नाबाद धावा काढणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला भारताचा अष्टपैलू गोलंदाज अक्षर पटेलने 12 धावांवर रोखले आणि भारताची विजयाची बाजू आणखी भक्कम केली. फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 3-3 फलंदाज बाद केले आणि त्यांच्यासोबत अक्षर पटेल, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद करून ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले.

Share this post

Leave a comment