रोहित शर्मा: एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या वेगळाच कारणांनी चर्चेत आला आहे.
ROHIT SHARMA: भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्मा ज्याने आपल्या अमूल्य कामगिरी आणि मेहनतीच्या जोरावर क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं उत्कृष्ट प्रदर्शन केलं, संपूर्ण जग ज्याला ‘हिटमॅन’ या नावानेदेखील ओळखते तो रोहित शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याच बोललं जात आहे. एकीकडे या वर्षी भारताने याच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 10 सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला होता पण दुर्दैवाने भारताला ऑस्ट्रेलिया कडून पराभव स्वीकारावा लागला होता.
क्रिकेटमधील सर्वात मनोरंजक असणाऱ्या टी-20 च्या सामन्यामध्ये रोहित शर्मा आता यापुढे देशाचे नेतृत्व करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्माने स्वतः वनडे वर्ल्डकप सुरू होण्याआधीच याबाबतीत बीसीसीआय सोबत चर्चा केल्याच सांगितल जात आहे. रोहित शर्माने भारताकडून शेवटची टी-20 मॅच 2022 च्या टी-20 वर्ल्डकप मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळली होती ज्यात इंग्लंड कडून भारताचा पराभव झाला होता, त्यामुळे इतर सामन्यामध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थित हार्दिक पांड्याने भारताचे नेतृत्व केले होते.
संबंधित बातम्या:
बीसीसीआय कडून सांगण्यात आले की, रोहित शर्मला स्वतःलाच टी-20 पासून दूर राहायचे आहे, त्याची प्राथमिकता फक्त वनडे वर्ल्डकपला होती. भारताकडे रोहित शर्माच्या जागी युवा सलामीवीर आहेत त्यात शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या अलौकिक कामगिरीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण केले आहे.
या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून मार्च 2024 पर्यन्त भारताला 7 कसोटी सामने खेळायचे आहेत त्यामुळे रोहित शर्मा सध्या पुढील भविष्याचा विचार करत असल्याच दिसतयं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने WTC स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती आणि अजूनही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताकडे 2025 साली होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये पोहोचण्याची संधि आहे.
रोहित शर्माने जिंकल्या आहेत 5 आयपीएल ट्रॉफी:
भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा आयपीएल मध्ये आकाश आणि नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स या टीम चे नेतृत्व करतोय, त्याने मुंबई इंडियन्स कडून खेळतांना तब्बल पाचवेळा आयपीएल ट्रॉफीवर मुंबई इंडियन्सचे नाव कोरले. रोहित शर्माला 2013 साली पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2020 साली चेन्नई सुपरकिंग्सला हरवून शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर रोहित शर्माला आयपीएल मध्ये ट्रॉफी जिंकता आलेली नाही.