India vs New Zealand Live: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार ICC Cricket World Cup 2023 मधील पहिला सेमीफायनल.IND VS NZ

source

IND vs NZ semi-final 2023: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्या मध्ये दुपारी दोन वाजता खेळला जाणार पहिला सेमीफायनल तर,चाहत्यांची उत्सुकता शिगेला.

source

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड अतिशय महत्वाचा असून भारताला 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची योग्य संधी आहे पण थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

IND VS NZ WORLD CUP 2023

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्ल्डकप मध्ये भारताने 9 पैकी 9 सामने सलग जिंकून भारताचाच 2003 सालच्या वर्ल्डकप मधील सलग 8 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया पासून सुरू झालेल्या भारताच्या विजयाची वाटचाल अजूनही सुरूच आहे.विशेष म्हणजे याचवर्षी साखळी सामन्यात याच भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता त्यामुळे आत्मविश्वासही भारतीयांच्या बाजूने आहे. आता अवकाश मात्र याच आत्मविश्वासाचे विजयी कामगिरीत रूपांतर करून फायनल मध्ये धडक मारण्याचे. आज मुंबईतील ऐतिसहिक वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी तमाम भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे, आज विजयी होणाऱ्या संघाला निश्चितपणे फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड इतिहास

भारत वर्ल्डकप 2023 ची ट्रॉफी जिंकण्यापासून आणखी दोन पावलं दूर आहे . तर आज सेमीफायनल मध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 2019 च्या वर्ल्डकप मध्ये कीवींनी भारताला सेमीफायनल मध्ये हरवून वर्ल्डकप मधून बाहेर काढले होते. भारताने आजपर्यंत न्यूझीलंड ला सेमीफायनल मध्ये हरवलेले नाही ही थोडी चिंताजनक बाब आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या मध्ये आयसीसी चे नॉकआऊट मॅचपैकी तीन मॅच झालेले आहेत तर या सर्व मॅच मध्ये टीम इंडिया ला हार पत्करावी लागली आहे. 

IND VS NED

साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँडसविरुद्ध 410 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. त्यामध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांची झंझावाती शतकी खेळी लक्षणीय होती. भारताची ही मधल्या फळीतील फलंदाजी आज असाच फॉर्मात राहिली तर मोठी धावसंख्या रचता येईल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तरी करता येईल.

या सामन्यात भारताने आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली होती. भारताकडून फलंदाजीला आलेल्या पहिल्या सर्व पाच फलंदाजांनी कमीतकमी 50 धावा आपल्या नावावर केलेल्या होत्या. त्यात रोहित शर्माने झंझावाती खेळी करून 61 धावा तर विराट कोहली आणि शुभमन गिल कडून प्रत्येकी 51 धावा तर श्रेयश अय्यर कडून तब्बल 128 धावांचा डोंगर उभारला होता त्याला साथ म्हणून घरच्या मैदानावर केएल राहुलने देखील भारताकडून वेगवान शतक केवळ 62 बॉल मध्ये ठोकले होते .

रोहित शर्मावर सर्वांचे लक्ष

Image source

भारताचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला येऊन परिस्थिती कशीही असली तरी भारताची आक्रमक सुरुवात करून देतो. मुंबईकर रोहित शर्मा आज घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्याने या स्पर्धेत केलेल्या वेगवान धावा मोठी धावसंख्या रचण्यात मदत करत आहेत तर आता हा बादफेरीचा सामना असल्यामुळे रोहित हाच फॉर्म कायम ठेवतो का याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. मुंबईकर रोहित शर्मा सोबत श्रेयश अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे देखील आज घरच्या मैदानावर खेळतील तर आज या सर्वांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे .

भारतीय गोलंदाज

SOURCE

या स्पर्धेत फलंदाजाप्रमाने भारतीय गोलंदाजांचे पण वर्चस्व राहिले आहे. भारताचे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे त्रिकुट वेगवान मारा करण्यासोबत लक्षणीय कामगिरी करत आहेत. त्यांना साथ म्हणून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हेसुद्धा आपली कसर सोडत नाही.

न्यूझलंडचा कर्णधार केन विलियमसन भारताला नेहमीच डोकेदुखी ठरत आहे. आज त्याला आणि भारतीय वंशाच्या राचिन रवींद्रला लवकर तंबूचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर असेल. 

संभाव्य PLAYING 11

भारत :

  • रोहित शर्मा (कर्णधार )
  • शुभमन गिल
  • विराट कोहली
  • श्रेयश अय्यर
  • केएल राहुल(विकेटकीपर )
  • सूर्यकुमार यादव
  • रवींद्र जडेजा
  • मोहम्मद शमी
  • कुलदीप यादव
  • जसप्रीत बुमराह
  • मोहम्मद सिराज

न्यूझीलंड:

  • डेवोन कॉन्वे
  • रचिन रवींद्र
  • केन विलियम्सन (कर्णधार )
  • डेरिल मिचेल
  • ग्लेन फिलिप्स
  • टॉम लाथम (विकेटकीपर)
  • मार्क चैपमैन
  • मिचेल सैंटनर
  • टिम साउदी
  • ट्रेंट बोल्ट
  • लोकी फर्ग्यूसन

हे पण वाचा:

Share this post

Leave a comment