IND VS NED उद्या दिनांक.12 Nov 2023 रोजी बेंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा म्हणजेच 45वा सामना खेळला जाणार आहे . ऐन दिवाळीच्या दिवशी भारतीय खेळाडू नेदरलँड ला धूळ चारून भारतीयांची दिवाळी आणखी गोड करण्याच्या प्रयत्नात असेल हे मात्र नक्की.
बेंगळूर: IND VS NED भारत आणि नेदरलँड यांच्यात रविवारी एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेतील अगदी शेवटचा सामना खेळला जाणार असून, हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे . भारताने आधीच वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज जर इंग्लंड ने पाकिस्तान ला पराभूत केल्यास येत्या बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी भारताचा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार असून सर्व क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यास फार उत्सुक आहेत.
टीम इंडिया ची कामगिरी
भारताने एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात सर्वच आठपैकी आठ सामने जिंकले असून त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, यावर्षीच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत सोडून इतर कोणत्याही देशाला हा विक्रम करता आलेला नाही .
भारताने विजयाची मालिका सुरू ठेवली असून उद्या होणाऱ्या नेदरलँड विरुद्ध च्या सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल केला जाणार नसून सर्वच खेळाडू कसून सराव करत आहेत. भारत गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानावर असून उद्याच्या सामन्यात विजय मिळाल्यास 18 गुणांसह 9 पैकी 9 साखळी सामन्याचा विजय एकट्या भारताच्या नावावर होणार आहे.
(ICC)आईसीसी च्या अव्वल क्रमवारीत भारतीय खेळाडू
- शुभमन गिल :
भारताचा सलामीचा युवा फलंदाज शुभमन गिल याने नुकताच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ला आईसीसी च्या क्रमवारीत मागे टाकले असून 830 गुणांसह अव्वल स्थानावर आपल्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. युवा फलंदाज शुभमन गिल भारताकडून सलामी करतांना चांगल्या धावा काढत आहे आणि हीच अपेक्षा बुधवारी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध च्या सामन्यात त्याच्याकडून असणार आहे .
- विराट कोहली :
आईसीसी च्या क्रमवारीत भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली ने देखील 770 गुणांसह चवथ्या क्रमांकावर आपल्या नावाची नोंद केली आहे. या वर्षीच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराटने गेल्या आठ सामन्यात भारताकडून सर्वाधिक 543 धावा काढल्या आहेत आणि 5 नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 49 वे शतक ठोकून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे.
विराट कोहली चे सोशल मीडिया वर करोडो चाहते आहेत. इंस्टाग्राम वर विराट चे 262 मिलियन चाहते असून रोनाल्डो, आणि मेस्सी नंतर संपूर्ण जगात विराट तिसऱ्या क्रमांकावर येतो, ही कामगिरी करणारा विराट एकटा भारतीय आहे.
- रोहित शर्मा :
विराट पाठोपाठ भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा देखील 739 गुणांसह आईसीसी च्या क्रमवारीत 6व्या स्थानावर विराजमान आहे . रोहित शर्मा सध्या चांगल्या लयीत असून भारताच्या डावाची चांगली सुरुवात करण्याच्या त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा भारतीय संघाने 8 पैकी 8 सामने जिंकले असून भारताला वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यासाठी रोहित शर्मा अतोनात प्रयत्न करत आहे.
भारतीय फलंदाजप्रमाने भारतीय गोलंदाजांनी देखील आईसीसी च्या क्रमवारीत आपल्या ठसा उमटवला आहे, त्यात मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर असून 709 गुण त्याच्या खात्यात जमा आहेत . त्यासोबत कुलदीप यादव 661 गुणांसह चवथ्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह 654 गुणांसह 8व्या क्रमांकावर आहे.मोहम्मद शमी 635 गुणांसह 10व्या क्रमांकावर असून, भारताचा प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजाच्या खात्यात 225 गुण जमा आहेत .
- IND VS NED संभाव्य प्लेइंग 11:
- टीम इंडिया :
- रोहित शर्मा (कर्णधार )
- विराट कोहली
- शुभमन गिल
- केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर )
- सूर्यकुमार यादव
- रवींद्र जडेजा
- जसप्रीत बूमराह
- मोहम्मद सिराज
- मोहम्मद शामी
- कुलदीप यादव
- श्रेयस अय्यर
- टीम नेदरलँड :
- वेस्ले बर्रेसी
- मैक्स ओडॉड
- कॉलिन एकरमैन
- साइब्रांड एंगेलब्रेक्ट
- स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर)
- बास डी लीडे
- तेजा निदामानुरु
- लोगान वान बीक
- रोल्फ वान डर मर्व
- आर्यन दत्त
- पॉल वान मीकेरन
भारतीय खेळाडूंची आईसीसी च्या अव्वल क्रमवारीत झेप आणि या वर्षी सलग सामने जिंकून भारतीयांना क्रिकेट चा अविस्मरणीय अनुभव हे भारतीय खेळाडूंनी करून दाखविले आणि सर्व भारतीयांना आनंदित केले ही अत्यंत अभामिनाची गोष्ट आहे. भारताने सलग दहा सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला आहे आणि आता त्यासाठीच चांगल्या खेळीची अपेक्षा भारतीय खेळांडु कडून असणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादच्या स्टेडियम मध्ये फायनल सामना पाहण्यास हजेरी लावणार असून त्यांच्या सोबत भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील हेजेरी लावतील.
अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून, संपूर्ण स्टेडियम मध्ये एक लाख 50 हजार च्या जवळपास दर्शकांसाठी जागा आहेत आणि अंतिम सामन्याच्या दिवशी हेच स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने अतोनात भरलेल असेल आणि भारताकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.