IND VS AUS WORLD CUP FINAL 2023:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सामन्यामध्ये भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमित शाह देखील उपस्थित राहणार असून संपूर्ण जगाचे या रोमांचक असणाऱ्या सामन्याकडे लक्ष असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मारलेस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री मा.श्री.भूपेंद्र पटेल यांनी काल या संदर्भात एक बैठक घेतली होती त्यात त्यांनी सुरक्षा व्यवस्था, स्टेडियम च्या परिसरीतील सुरक्षा तसेच स्वच्छतेबद्दल पाहणी केली होती.
अहमदाबाद : रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया ने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आपला अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केलेला आहे.
येत्या रविवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमहर्षक सामना पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातील चाहते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये येतील.
संबंधित बातम्या:
भारत आणि ऑस्ट्रेलिया तब्बल 20 वर्षानंतर एकदिवसीय वर्ल्डकप सामन्याच्या फायनलमध्ये आमने -सामने येणार आहे . भारताने यावर्षी सलग 10 सामने जिंकून फायनल मध्ये आपला विजयरथ पोहोचवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने देखील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर सलग 8 सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आता या मागच्या सर्व गोष्टी विसरून दोन्ही संघांना पूर्ण ताकदीनिशी सराव करून खेळ खेळावा लागेल आणि त्यासाठीच भारतीय संघ गुरुवारीच संध्याकाळी अहमदाबाद मध्ये दाखल झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियाचा संघ देखील शुक्रवारी दाखल झाला आहे.
अंतिम सामन्यात होणार विविध कार्यक्रम
या सामन्या दरम्यान भारतीय नौदलाकडून एयर शो होणार असून, त्याची रंगीत तालिम आज शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये करण्यात आली होती. तसेच सामना सुरू होण्याआधी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच सुद्धा आयोजन केल जाणार आहे.
काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स?
ऑस्ट्रेलिया चा कर्णधार पॅट कमिन्सने आज अहमदाबादमध्ये झालेल्या प्रेस काँफ्रेन्समध्ये म्हटलं की, ‘भारताविरुद्ध फायनल खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण आमच्यासाठी खूप खास असेल कारण भारतीय टीम चे सर्व चाहते त्यांच्या समोर त्यांना प्रोत्साहन देतील आणि खरोखरच भारतीय टीमने खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळून फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तसेच पॅट कमिन्स पुढे म्हणाला की ,’ जेव्हा माझा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेन तेव्हा मी नरेंद्र मोदी स्टेडियम मधील चाहत्यांच्या गर्जना शांत करू इच्छितो’.