भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना 2023: भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले, वर्ल्डकप भारताचा हातून निसटला.
अहमदाबाद : या वर्षीच्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजेय असलेल्या भारताचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले आणि करोडो भारतीयांचा अपेक्षांवर पाणी फिरले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताच्या भूमीवर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया ने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, अहमदाबादमधील स्टेडियमच्या खेळपट्टीवर दुपारी चेंडू काहीसा थांबून येतो हे ऑस्ट्रेलियाने बरोबर ओळखले आणि भारताला प्रथम फलंदाजीस धाडले. कालची खेळपट्टी जरी कोरडी असली तरी अंतिम सामण्याचे दडपण भारतीयांना पेलवले नाही आणि तिथेच भारताची बाजू कमकुवत झाली.
ज्या ऑस्ट्रेलियापासून भारताच्या विजयरथाची सुरुवात झाली होती दुर्दैवाने त्याच ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात मात्र शरणागती पत्करावी लागली. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती पण बेजबाबदारपणा अंगाशी आला. शुभमन गिल च्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला आणि भरगच्च भरलेल्या स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली. त्यानंतर रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक खेळीची सुरुवात करतांना पहिल्यांदा हेजलवूडवर हल्ला चढवला आणि नंतर ग्लेन मॅक्सवेलच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर गरज नसतांना मोठा फटका रोहित कडून मारला गेला आणि ट्रेविस हेडने रोहितचा झेल घेतला, पाठोपाठ श्रेयश अय्यरनेही अपेक्षाभंग केला आणि तिथूनच भारताची बाजू आणखी कमकुवत झाली.
मग काय पहिल्या 12 षटकांत तीन विकेट गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर आली. अत्यंत दडपणाखाली त्यांना सावधगिरीने खेळ खेळावाच लागला. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात 62 चेंडूत वेगवान शतक करणाऱ्या राहुलला काल 62 धावा काढण्यासाठी 100 चेंडू लागले, यावरून दडपणाची कल्पना करता येईल. विराट कोहलीने अर्धशतक करून भारताच्या मोठ्या धावसंखेच्या अपेक्षा जीवंत ठेवल्या होत्या पण पॅट कमिंसच्या चेंडूवर विराटच्या बॅटला लागलेला चेंडू यष्टींवर लागला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये शेकडो चाहते असून भयाण शांतता पसरली.
या कारणामुळे झाला भारताचा पराभव :
- कमी धावसंखेच आव्हान: भारताने प्रथम फलंदाजी करतांना अपेक्षित धावसंख्या उभारली नाही आणि याच गोष्टीमुळे त्यांचा आत्मविशास कमी झाला त्याचा परिणाम क्षेत्ररक्षणात दिसून आला. आणखी 60 ते 70 धावा जमल्या असत्या तर चित्र वेगळे असते.
- बेजबाबदारपणा अंगाशी आला: भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली खरी पण बेजेबाबदरपणे फटका मारून विकेट दिल्यामुळे भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव आला आणि त्यामुळे जास्त धावसंख्या निर्माण करण्यात अपयशी ठरले.
- क्षेत्ररक्षणात चुका: भारताने 241 धावांच आव्हान दिल्यानंतर ऑस्ट्रेलियावर धावसंखेच्या पाठलाग करतांना चांगला दबाव निर्माण करायचा होता, पण ते शक्य झाले नाही. क्षेत्ररक्षणात अडथळे आलेत सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चे दोन विकेट गेल्यानंतर गोलंदाज ट्रेविस हेड ला लवकर बाद करण्यात अपयशी ठरले, ऑस्ट्रेलियाकडून लीलया चेंडू सीमारेषेपार जात होता. तर दुसरीकडे भारताकडून तब्बल 98 चेंडूनंतर पहिला चौकार मारला गेला.
- फलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत: शुभमन गिल, श्रेयश अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असतांना त्यांनी दबावात येऊन निराशा केली.
- ऑस्ट्रेलिया कडून भारताच्या प्रत्येक फलंदाजांच्या कच्च्या बाजू ओळखून त्यानुसार गोलंदाजी करण्यात आली आणि त्यात ते यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलिया ने हवामानाचा योग्य अंदाज घेतला आणि प्रथम गोलंदाजी करून भारताला कमी धावसंख्या करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलिया कडून उत्तम क्षेत्ररक्षण करून भारतीयांना चौकार षटकार मारण्यापासून रोखले.
संपूर्ण देशभरात काल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याची उत्सुकता होती, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सगळीकडे निळाच निळा रंग दिसत होता संपूर्ण मैदान भारतीय प्रेक्षकांनी खचाखच भरलेल होत, संपूर्ण देशाला भारताच्या विजयाची अपेक्षा होती, तसेच विविध दिग्गज मंडळींनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. पण भारताच्या पराभवामुळे संपूर्ण मैदानात भारतीय चाहते असून संपूर्ण स्टेडियम मध्ये काही चाहत्यांना अश्रु अनावर झाले तर संपूर्ण भारतीय चाहते निराश होऊन मैदानाबाहेर जातांना दिसले, चाहत्यांना पराभव जिव्हारी लागला.
अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलीवुड कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. किंग शाहरुख खान पत्नी गौरी खान सोबत स्टेडियम मध्ये दिसला त्यांच्यासोबत आर्यन खान आणि सुहाना खान देखील उपस्थित होते. त्यासोबतच रणवीर सिंह आणि पत्नी दीपिका पादुकोण देखील अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबाद च्या स्टेडियम मध्ये दाखल झाले होत.
असो, शेवटी खेळात हार जीत होतच असते, भारताने या वर्षी सलग दहा सामने जिंकून सर्व भारतीयांना आनंदित केले होते, भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळी करून भारताला फायनल मध्ये पोहोचवले होते आणि परभवामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नसून त्यांना एक अनुभव आला आहे आणि ते नक्कीच येणाऱ्या काळात आणखी जोमाने कामगिरी करतील अशी, सर्व भारतीयांना अपेक्षा आहे आणि या वर्षी खरोखर भारताने ऐतिसाहिक कामगिरी करून करोडो भारतीयांची मने जिंकली, ही अभिमानाची गोष्ट आहे.