रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे
रणबीरच्या या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे
Animal या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी तब्बल दोनशे कोटींची कमाई केली असून लवकरच 500 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tरणबीर कपूर सोबत अभिनेता बॉबी देओल देखील या चित्रपटात मुख्य भूमकेत आहे
प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारतांना दिसत आहे आणि यात त्यांच्या लूक्स ची चर्चा सर्वत्र रंगत आहे.
त्यानंतर साऊथ ची अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील अॅनिमल या चित्रपटात दिसली असून तिची भूमिका सुद्धा महत्वाची आहे.रश्मिका सोशल मीडिया वर देखील खूप सक्रिय असते आणि सोशल मीडिया वर देखील तिचे करोडो चाहते आहे
रश्मिका पाठोपाठ आता तृप्ती डीमरी ही देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे,या चित्रपटात रणबीर सोबत केलेल्या सीन मुळे तृप्ती सध्या चांगलीच चर्चेत आहे