मराठी चित्रपट सृष्टीत आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणाऱ्या उमेश कामत याचा आज 45 वा वाढदिवस आहे
उमेश कामत
प्रिया बापट ची खास पोस्ट
---------------------------
उमेशची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट हिने सोशल मीडिया वर उमेशचे खास फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे
अभिनेत्री प्रिया हिने उमेशचा फोटो शेअर करतांना लिहिले की, "माझ्या गोड उमेश, तू माझ्या आयुष्यात असणं हे माझ सर्वात मोठ भाग्य आहे. मला कसं चिडवायच आणि कसं प्रेम करायच हे तुला चांगलाच माहीत आहे.'"
प्रिय पुढे लिहिते"'तुला आयुष्यभर पुरेल एवढ प्रेम आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही शेअर करत असलेला सुंदर वेडेपणा सदैव जीवंत राहू दे"
प्रिया ने लिहिला सुंदर मेसेज
प्रिया ने हा फोटो शेअर करून उमेश ला आपल्या आई आणि बाबांचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत आहे याची जाणीव करून दिली आहे आणि तुझे आई बाबा सदैव तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत असं ती म्हणाली.
प्रिया बापटने आज एकूण सात फोटो शेअर केले असून त्यात तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीचा उमेश सोबत फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, शारिवाचा तू कायम आवडता राहशील
शारिवा सोबतच फोटो केला शेअर
अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न केलं. आभाळमाया या मालिकेच्या सेटवर दोघ एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि तेव्हाच त्यांची मैत्री झाली